Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या जाजम-घडयाळ खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती, पंधरा दिवसात अहवाल सादर होणारशिये फाटा येथे गोळीबार, संभापूरचा तरुण पोलिसांच्या ताब्यातथेट पाईपलाईन योजना म्हणजे कोल्हापूरच्या माथी मारलेला पांढरा हत्ती, सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांची माफी मागावीखाजगी शिक्षक पतसंस्थेची मोबाईल बँकिंग सुविधा आदर्शवतवारणा विद्यापीठाच्या खेळाडूंची बास्केटबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडप्राथमिक शिक्षण विभागात गतीमान कामाचा धडाका, वर्षभरात ५७० जणांना पदोन्नती !करनूरमध्ये होणार दिव्यांग पुनर्वसन केंद्र ! मंगळवारी भूमिपूजन समारंभ !! सत्ताधाऱ्यांचे ऐकून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून थेट पाइपलाइन योजनेत अडथळे-काँग्रेसच्या नगरसेवकांचा आरोपगणेशोत्सव कामासाठी महापालिकेकडून कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ! शिक्षकांनी टाकला कामावर बहिष्कार !!कोल्हापुरातील डॉक्टर कुटुंबीयांची ४२ लाखाची आर्थिक फसवणूक

जाहिरात

 

करनूरमध्ये होणार दिव्यांग पुनर्वसन केंद्र ! मंगळवारी भूमिपूजन समारंभ !!

schedule30 Aug 25 person by visibility 57 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दिव्यांग व्यक्ती सक्षम बनाव्यात , त्यांचे पुनर्वसन व्हायला हवे आणि त्यांनी समाजात स्वाभिमानपणे जगायला पाहिजे हा उद्देश ठेवून कार्यरत असलेल्या साहस डिसएबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशन कोल्हापूरतर्फे कागल तालुक्यातील करनूर येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. दोन एकर जागेच्या परिसरात होणाऱ्या या केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ 2 सप्टेंबर 2025 रोजी होत आहे अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष डॉ. नसीमा हुरजूक व सचिव तेज घाटगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. खासदार शाहू महाराज हे अध्यक्षस्थान भूषविणार घोषणा आहेत.  याप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक व खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी 11 वाजता करनूर येथे हा कार्यक्रम होत आहे.     दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या बांधकामासाठी सात कोटी पन्नास लाख रुपये खर्च आहे. समाजातील विविध घटकांनी, दिव्यांगांसाठी उभारण्यात येणाऱ्या या पुनर्वसन केंद्राला मदत करावी.  या केंद्राच्या एका चौरस फूट बांधकामासाठी दोन हजार रुपये खर्च आहे. प्रत्येकाने एका चौरस फुटाच्या बांधकामाचा खर्च मदत म्हणून दिली तर दिव्यांग  पुनर्वसन केंद्र वर्षभरात साकारेल असे हुरजूक त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी या सेवाभावी उपक्रमासाठी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले. या पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगाराची विविध कौशल्य शिकविली जाणार आहेत. तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. करनूर येथील संस्थेच्या इमारतीसाठी जमीन खरेदी केली आहे. यासाठी विविध घटकांनी मदत केली. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोलाची मदत झाली असेही त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष अभिषेक मोहिते, विश्वस्त साताराम पाटील, अश्कीन आजरेकर, श्रीमती मधु पाटील आदी उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes