खाजगी शिक्षक पतसंस्थेची मोबाईल बँकिंग सुविधा आदर्शवत
schedule30 Aug 25 person by visibility 35 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन : खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची मोबाईल बँकिंगची सुविधाआदर्शवत असून सभासदांना ती लाभदायक ठरेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधिक्षक उदय सरनाईक यांनी केले.ते खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या मोबाईल बँकिंग ॲपच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे हे होते. पतसंथेच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी बोलताना उदय सरनाईक म्हणाले,संस्थापक भरत रसाळे यांच्या मार्गदर्शनांखाली पतसंस्थेची घोडदौड चालूआहे सभासदांच्या हितासाठी झटणारी ही संस्था आहे. सभासदांना त्यांच्या सर्व खात्यांची माहिती अद्यावतपणे मिळावी यासाठी पतसंस्थेने मोबाईल बँकिंग सुविधा निर्माण करून देऊन पारदर्शी कारभाराचा आदर्श सहकार क्षेत्रांपुढे ठेवला . संस्थापक भरत रसाळे यांनी पतसंस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा घेऊन सभासदांच्या कल्याणासाठी राबवणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन सभासदांच्या सहकार्यामुळेच या पतसंस्थेचा वटवृक्ष झाला आहे असे प्रतिपादन केले. प्रास्ताविकांमध्ये पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे यांनी संस्था संचालक मंडळ हे विश्वस्त म्हणून काटकसरीने आणि पारदर्शी कारभार करत असल्याने संस्थेला तीन कोटी पेक्षा जास्त नफा झाल्याचे सांगितले.यावेळी नेटवीन सिस्टीमचे महेश पाटील यांनी मोबाईल बँकिंगची माहिती दिली.स्वागत पतसंस्थेचे संचालक महादेव डावरे यांनी केले. यावेळी संचालक वर्षाराणी वायदंडे ,राजेद्र कोरे ,संतोष आयरे यांनी मनोगत व्यक्त केले आभार व्हाईस चेअरमन कृष्णात चौगले यांनी मानले . सूत्रसंचलन संचालक शिवाजी सोनाळकर यांनी केले.यावेळी माजी संचालक शिवाजी भोसले, संचालक सर्वश्री राजेश कोंडेकर,साताप्पा कासार , सूर्यकांत बरगे ,सर्जेराव नाईक, रोहिणी येडगे, अमित परीट, वसंत पाटील, सल्लागार समिती सदस्य पंडित मस्कर,दशरथ कांबळे, आप्पासाहेब वागरे,चंद्रकांत वाकरेकर ,व्यवस्थापक सदाशिव साळवी उपस्थित होते.