वारणा विद्यापीठाच्या खेळाडूंची बास्केटबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
schedule30 Aug 25 person by visibility 41 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी जानवी खामकर व यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षला पाटील यांची ७५ व्या ज्युनियर बास्केटबॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या १२ जणांच्या संघात निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा दोन ते नऊ सप्टेंबर २०२५ दरम्यान लुधियाना येथे होणार आहे. या यशाबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिनी, यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. क्रीडा प्रशिक्षक उदय पाटील यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.