जिल्हा परिषदेतर्फे शुक्रवारपासून वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ
schedule09 Jan 25 person by visibility 225 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा शुक्रवारपासून (१० जानेवारी २०२५) सुरू होत आहेत. या स्पर्धेची सुरुवात महिला क्रिकेट खेळापासून होणार आहे.
मेरी वेदर ग्राउंड येथे सकाळी दहा वाजता स्पर्धेचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन. एस यांच्या शुभ हस्ते होणार आहे. महिला क्रिकेट स्पर्धेसाठी तालुक्यातून बारा संघ व मुख्यालयातून दोन संघ असे एकूण चौदा संघ सहभागी झाले आहेत. यानंतर पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेस होणार आहेत. जिल्हा परिषद कोल्हापूरकडील क्रीडा स्पर्धा २०१४-१५ पासून होत आहेत. क्रीडा स्पर्धेमध्ये महिला व पुरुषांचे सांघिक खेळ प्रकारात कबडडी, खो-खो, रिले, व्हॉली बॉल, बॅडमिंटनचा समावेश आहे.
वैयक्तिक स्पर्धेमध्ये कॅरम, बुध्दीबळ, सायकलींग, गोळा फेक, थाळी फेक, शंभर मीटर, २०० व ४०० मीटर धावणे, बॅडमिंटन या खेळांचा समावेश आहे. तसेच दोन दिवस सांस्कृतीक कार्यक्रमही घेतले जातात. त्यामध्ये कराओके, लाईव्ह सिगिंग, ग्रुप डान्स, सोलो डान्स, मिमिक्री यांचा समावेश असतो.