कोल्हापुरात रविवारी ब्रह्मऊर्जा उद्योग परिषद ! शिरीष बेरी, प्रमोद पुरोहित, दिलीप गुणे, पद्माकर सप्रेंना पुरस्कार!!
schedule09 Jan 25 person by visibility 51 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ब्राह्मण बिझनेस फोरम, कोल्हापूरतर्फे रविवारी, (१२ जानेवारी २०२५) ब्रह्मऊर्जा उद्योग परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये कोल्हापुरातील नामवंत उद्योजकांना उत्कृष्ट उद्यमशीलता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.यामध्ये जागतिक किर्तीचे आर्किटेक्ट शिरीष बेरी, डॉ. प्रमोद पुरोहित, फायटो फार्माचे दिलीप गुणे, उद्योजक पद्माकर सप्रे, , संवाद हिअरिंग एड्स या संस्थेच्या श्रीमती शिल्पा हुजुरबाजार यांना गौरविण्यात येणार आहे. हॉटेल पॅव्हेलियन सकाळी ९ ते सायंकाळी पाच या वेळेत परिषद होत आहे. या परिषदेला चितळे ग्रुप पुणेचे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे, सीआयआयचे बोर्ड मेंबर दीपक घैसास हे उद्योग परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेसाठी उपस्थित असलेल्या उद्योजकांचे नेटवर्किंग स्वरूपामध्ये सेशन्स होणार आहेत. साधारण 300 च्या आसपास उद्योजक एकमेकांशी आपल्या व्यवसायाच्या माहितीची देवाण-घेवाण होणार आहे. फोरमचे अध्यक्ष रामचंद्र टोपकर यांनी या परिषदेसंबंधीची माहिती दिली आहे. या परिषदेच्या निमित्ताने जवळपास ३०० उद्योजक एकत्र येत आहेत.