जहाजातली नोकरीसंबंधी रविवारी करिअर मार्गदर्शन
schedule09 Jan 25 person by visibility 26 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मर्चंट नेव्हीमधील (जहाजातील नोकरी) संदर्भात कोल्हापुरात रविवारी, (१२ जानेवारी २०२५) करिअर मार्गदर्शन कार्यक्रम होत आहे. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीच्या संधी आहेत. त्यासंबंधी माहिती करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात दिली जाणार आहे. शाहू स्मारक भवन येथील मिनी सभागृहात सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर के लाईन शिपिंग कंपनीचे बाळासाहेब पाटोळे यांनी यासंबधीची माहिती दिली. या कार्यक्रमात पाटोळे हे मार्गदर्शन करणार आहेत. मराठी तरुणांची संख्या मर्चंट नेव्हीमध्ये कमी आहे. यामध्ये हा टक्का वाढावा म्हणून मार्गदर्शन केले जाणार आहे. पाटोळे हे गेली २८ वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जमदग्नी करणार आहेत. पत्रकार परिषदेला संदीप पाटोळे उपस्थित होते.