Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सुभाषनगर पंपिंग स्टेशनधील नवीन पाइपलाइनचे उद्घाटनजहाजातली नोकरीसंबंधी रविवारी करिअर मार्गदर्शन जिल्हा परिषदेतर्फे शुक्रवारपासून वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभगोकुळतर्फे शुक्रवारी दोन्ही मंत्र्यांचा गौरव, जिल्ह्यातील खासदारांचाही सत्कार !शिक्षक भरतीसंदर्भात  कौस्तुभ  गावडेंचे शिक्षणमंत्र्यांना निवेदननको बाजार समित्या, नको सेस ! व्यापारी-व्यावसायिक आंदोलनाच्या पावित्र्यात !! चेंबरच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी मांडली भूमिकाश्यामकान्त जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्कार श्रीकांत डिग्रजकर यांना जाहीरकोल्हापुरात रविवारी ब्रह्मऊर्जा उद्योग परिषद !  शिरीष बेरी, प्रमोद पुरोहित, दिलीप गुणे, पद्माकर सप्रेंना पुरस्कार!!भारतीय मजदूर संघांच्या पदाधिकाऱ्यांची कामगारमंत्र्यांच्यासोबत बैठकशनिवारी उलघडणार कोल्हापुरची कुस्ती परंपरा, पैलवान संग्राम कांबळेंचे व्याख्यान

जाहिरात

 

श्यामकान्त जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्कार श्रीकांत डिग्रजकर यांना जाहीर

schedule09 Jan 25 person by visibility 78 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील श्यामकान्त जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कला संघटक श्रीकांत डिग्रजकर यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ शरद भुताडिया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एकूण कला, संगीत, साहित्य अशा विविध क्षेत्रात गेली ७० हून अधिक वर्षे त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून दि. १९ जानेवारी २०२५ रोजी "रंगबहार" संस्थेमार्फत त्यांना"शामकान्त जाधव रंगबहार जीवन गौरव-२०२५" पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. असे रंगबहारचे संस्थेचे व्ही. बी. पाटील, धनंजय जाधव, संजीव संकपाळ प्रा अभिजीत कांबळे यांनी कळविले आहे

श्रीकांत डिग्रजकर हे सांगीतिक पार्श्वभूमी लाभलेल्या घराण्यात जयपूर घराण्याचे ख्यातकिर्त कलाकार जेष्ठ गानगुरू पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, सुरूवातीला त्यांच्यासोबत गाणी शिकण्याचा प्रयत्न पण तबला वादनाकडे विशेष ओढा असल्याने गुरूवर्य कै. केशवराव धर्माधिकारी यांचेकडे तबला शिक्षणास सुरूवात तसेच कै. पं. निवृत्तीबुवा सरनाईक, बुजुर्ग तबलावादक उस्ताद कै. गणपतराव कवठेकर, कै. यशवंत अष्टेकर यांच्याकडून तबला वादनातील गुपिते, विकास या विषयी मौल्यवान मार्गदर्शन साथ करण्याची संधी त्यांना लाभली. १९७५ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या सहवासात त्यांनी कथा, पटकथा, संवाद लेखन त्या बरोबर बाबांचे स्वीय सहाय्यकपदी तसेच जयप्रभा स्टुडियोचे महाव्यवस्थापकपदी काम करत होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सुधीर फडके, व्ही. शांताराम, सुलोचनादीदी, विश्राम बेडेकर, गं. दि. माडगूळकर, बाबा आमटे यासारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला.

गायन समाज देवल क्लबच्या कार्यकारी मंडळामध्ये १९९९ ते आजअखेर गेली २५ वर्षे विश्वस्त व संचालक पदावर कार्य करीत असताना सातशेहून अधिक संगीत संमेलने, महोत्सव व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले व संस्थेच्या कला संकुलाचे अडीच कोटीचे काम पूर्ण केले. कोल्हापूरातील ज्येष्ठ चित्रकार व लेखक कै. श्यामकान्त जाधव यांनी स्थापन केलेल्या रंगबहार या संस्थेच्या स्थापनेपासून सहकारी, संस्थेचे कार्यवाह ते पाच वर्षे संस्थेचे अध्यक्षपद ही सांभाळले. "रंगबहारच्या" माध्यमातून मान्यवर कलाकार यांचे बरोबर उदयोन्मुख चित्रकारांची प्रात्यक्षिके, प्रदर्शने, व्याख्याने, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने, कवि संमेलने, चित्रकला स्पर्धा या सारख्या विविध उपक्रमासोबत "मैफल रंग सुरांची" या अभिनव उपक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. तसेच बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे सदस्य म्हणून अनेक वर्षे कार्य केले. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र या संस्थेचे सुरूवातीपासून कार्यवाह म्हणून काम केले. तसेच देवल क्लबच्या वतीने संगीत विषयावरील विश्वकोश निर्मितीसाठी १८ ते २० लेखांचे लिखान केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes