शनिवारी उलघडणार कोल्हापुरची कुस्ती परंपरा, पैलवान संग्राम कांबळेंचे व्याख्यान
schedule09 Jan 25 person by visibility 33 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूर , आठवणीतील कोल्हापूर आणि कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पैलवान संग्राम कांबळे यांचे ’विषय -कोल्हापूरची कुस्ती इतिहास आणि परंपरा’या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. सायंकाळी साडे पाच वाजता कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता व्याखयान होणार आहे. या व्याख्यानाच्या माध्यमातून कोल्हापुरात झालेल्या कुस्ती मैदानांची माहिती, किस्से ऐकावयास मिळणार आहेत. कुस्तीप्रेमींनी या व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.