सुभाषनगर पंपिंग स्टेशनधील नवीन पाइपलाइनचे उद्घाटन
schedule09 Jan 25 person by visibility 23 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुभाषनगर येथील पंपिंग स्टेशनमधून पाचगाव, आरकेनगर, मोरेवाडी, कंदलगाव, बळवंतनगर यासह शहराच्या उपनगरात तसेच ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो. या पंपिंग स्टेशनमध्ये पंप सेट्स, सॉफ्ट स्टार्टर पॅनल आणि नवीन पाईपलाइनचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.
दुप्पट क्षमतेचे नवीन पंप सेट्स बसवल्यामुळे सुभाष नगर पंपिंग स्टेशन मधून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे ज्या भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो त्या ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध होईल याची खात्री आहे. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्य जल अभियंता हर्षजित घाटगे, शाखा अभियंता हुजरे, तांत्रिक अभियंता जयेश जाधव, पाचगाव ग्रामपंचायत सदस्य सागर दळवी, राजाराम शिवगंध, बापू हवालदार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.