Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या जाजम-घडयाळ खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती, पंधरा दिवसात अहवाल सादर होणारशिये फाटा येथे गोळीबार, संभापूरचा तरुण पोलिसांच्या ताब्यातथेट पाईपलाईन योजना म्हणजे कोल्हापूरच्या माथी मारलेला पांढरा हत्ती, सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांची माफी मागावीखाजगी शिक्षक पतसंस्थेची मोबाईल बँकिंग सुविधा आदर्शवतवारणा विद्यापीठाच्या खेळाडूंची बास्केटबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडप्राथमिक शिक्षण विभागात गतीमान कामाचा धडाका, वर्षभरात ५७० जणांना पदोन्नती !करनूरमध्ये होणार दिव्यांग पुनर्वसन केंद्र ! मंगळवारी भूमिपूजन समारंभ !! सत्ताधाऱ्यांचे ऐकून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून थेट पाइपलाइन योजनेत अडथळे-काँग्रेसच्या नगरसेवकांचा आरोपगणेशोत्सव कामासाठी महापालिकेकडून कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ! शिक्षकांनी टाकला कामावर बहिष्कार !!कोल्हापुरातील डॉक्टर कुटुंबीयांची ४२ लाखाची आर्थिक फसवणूक

जाहिरात

 

यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक राज्यव्यापी दौऱ्यावर, नागपूर येथून सुरुवात

schedule12 May 25 person by visibility 461 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागपूरमधून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. नागपूर आणि वर्धा शहरातील सामाजिक, राजकीय आणि डिजीटल क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. प्रारंभी नागपूरमध्ये भाजप कार्यालयाला भेट देवून, युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तरूणांना संधी आणि डिजीटल माध्यमांचा सकारात्मक उपायोग या विषयावर त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तर नागपूरमधील जापनिज गार्डन इथं कृष्णराज यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची भेट घेतली.

नागपूरचे आमदार परिणय फुके यांच्या निवासस्थानी जावून फुके कुटुंबियांशी संवाद साधला. तरूणांसाठी रोजगारनिर्मिती, स्टार्टअपना चालना आणि क्रीडा क्षेत्राचा विकास याबाबत कृष्णराज महाडिक यांनी भूमिका मांडली. दरम्यान वर्धा येथे राज्यमंत्री नामदार पंकज भोयर यांनी विदर्भ क्रिएटर्स कॉंक्लेव्हचे आयोजन केले होते. या मेळाव्याला उपस्थित राहून सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग, समाजावर होणारा परिणाम याबाबत विवेचन केले. त्यातून कृष्णराज यांनी विदर्भातील तरूण सोशल मीडिया क्रिएटरना एक दिशा दिली.

नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेसाठी निमंत्रित अतिथी म्हणून कृष्णराज महाडिक यांनी हजेरी लावली. राज्यमंत्री  भोयर यांच्या पुढाकारातून आयोजित स्पर्धेत देशभरातील नामवंत कब्बडीपटूंचा सहभाग होता. याप्रसंगी कृष्णराज महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी खेळाचे महत्व स्पष्ट करत, आत्मविश्‍वास, शिस्त, आरोग्य संवर्धन, खिलाडूवृत्ती आणि संघभावना यासाठी खेळांचे महत्व असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या खेलो इंडिया अभियानाचे महत्व त्यांनी विषद केले. नागपूरमधून महाराष्ट्र दौर्‍याची सुरूवात झाली असून, अत्यंत सकारात्मक आणि उत्साही प्रतिसाद मिळत असल्याबद्दल यांनी आपले फॉलोअर, तरूण कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी यांच्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes