जिल्ह्यात ३६८४ शाळांमध्ये योगदिन साजरा
schedule22 Jun 25 person by visibility 86 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय योगदिन कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद, महापालिका, खासगी अनुदानित, विना अनुदानित व इंग्रजी माध्यमासह मिळून ३६८४ शाळेत योगदिनाचे आयोजन केले होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रेरणेने व जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम झाले. शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर, माध्यमिक सुवर्णा सावंत यांनी सर्व शाळांमध्ये सकाळी आठ ते ८.४५ या एकाच वेळेत योग दिन साजरा करण्यात आला. जागतिक योग दिन प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनामार्फत ४५ मिनिटांचा प्रात्यक्षिक व्हिडिओ करण्यात. शाळेत शॉर्ट फिल्म व्याख्यान व शाळा परिसरात प्रचार व प्रसार फेरी निघाली. यामध्ये शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक माजी विद्यार्थी शाळा परिसरातील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळे यांचा सहभाग दिसून आला.