Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजर्षी शाहू विद्यामंदिराला माजी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेटकेंद्र, राज्य सरकारने राजर्षी  शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे कृती करावी : खासदार शाहू महाराजपालकमंत्री आबिटकर, आमदार महाडिकांनी केली क्रीडा संकुलाची पाहणीउद्योजकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उद्योगमंत्र्यांच्यासोबत विशेष बैठककृषी-तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटेंना पीएचडीजिल्ह्यात ३६८४ शाळांमध्ये योगदिन साजराहद्दवाढीच्या प्रस्तावात नवी उजळाईवाडीचा समावेश, पीरवाडीचा चुकून उल्लेख-राजेश क्षीरसागरकोटा, पुणेच्या धर्तीवर कागलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र करणार-मंत्री हसन मुश्रीफपप्पा सांगा कुणाचे… पप्पा साऱ्या कलारसिकांचे ! अरुण सरनाईक म्हणजे मराठी सिनेमाचे सिंहासन!! हद्दवाढीचे काम निस्वार्थपणे, कुठलाही स्वार्थ नाही ! आठ गावांच्या समावेशाबाबत आयुक्तांना पत्र !!

जाहिरात

 

केंद्र, राज्य सरकारने राजर्षी  शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे कृती करावी : खासदार शाहू महाराज

schedule23 Jun 25 person by visibility 16 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण, उद्योग ,धार्मिक क्षेत्रात  व इतर सर्व क्षेत्रांमध्ये दूरदृष्टीने काम केले.त्यांचे विचाराने केंद्र आणि राज्य सरकारने कृती करावी. राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन  केलेल्या या शिक्षण संस्थेतील शहाजी महाविद्यालयाने राबवलेल्या विविध उपक्रमातून शाहूंचे विचार विद्यार्थ्यांच्या पर्यंत, समाजापर्यंत पोहोचण्यास अधिक मदत झाली  आहे.   अशी अपेक्षा कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी आज व्यक्त केली. 
  श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने संपादित केलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची  प्रस्तुतता या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन  मानसिंग विजयराव बोंद्रे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  होते.राजीवजी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन  राहुल पाटील, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
उच्च शिक्षण  विभाग कोल्हापूरचे  सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव म्हणाले , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात शाहू महाराजांच्या विचाराची प्रेरणा होती. महाराजांनी विद्यार्थ्यांना त्यावेळी उपस्थित भत्ता सुरू केला होता. शिक्षणाबाबतचा त्यांचा तो दूरदृष्टीपणा होता. ग्रंथाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे विचार समाजापुढे जाण्यास मदत होणार आहे.   

राहुल पी. पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता यासारख्या ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापुरात पहिल्यांदाच होत आहे. माझे आजोबा स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे  आणि वडील स्वर्गीय पी. एन. पाटील यांनी शाहू महाराजांचा विचार कृतीतून पुढे नेला. त्याच विचारातून मी व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन  मानसिंग बोंद्रे हे  वाटचाल करीत आहोत. प्राचार्य डॉ. आर. के.शानेदिवाण यांनी ग्रंथ निर्मिती पाठीमागची भूमिका विषद केली.  ग्रंथातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल डॉ. डी. एल.काशीद पाटील, डॉ विजय देठे, प्राचार्य शानेदिवाण, प्रकाशक अनिल म्हमाने, डॉ. पी बी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. पी के पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. जे.के.पवार, प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes