Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजर्षी शाहू विद्यामंदिराला माजी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेटकेंद्र, राज्य सरकारने राजर्षी  शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे कृती करावी : खासदार शाहू महाराजपालकमंत्री आबिटकर, आमदार महाडिकांनी केली क्रीडा संकुलाची पाहणीउद्योजकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उद्योगमंत्र्यांच्यासोबत विशेष बैठककृषी-तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटेंना पीएचडीजिल्ह्यात ३६८४ शाळांमध्ये योगदिन साजराहद्दवाढीच्या प्रस्तावात नवी उजळाईवाडीचा समावेश, पीरवाडीचा चुकून उल्लेख-राजेश क्षीरसागरकोटा, पुणेच्या धर्तीवर कागलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र करणार-मंत्री हसन मुश्रीफपप्पा सांगा कुणाचे… पप्पा साऱ्या कलारसिकांचे ! अरुण सरनाईक म्हणजे मराठी सिनेमाचे सिंहासन!! हद्दवाढीचे काम निस्वार्थपणे, कुठलाही स्वार्थ नाही ! आठ गावांच्या समावेशाबाबत आयुक्तांना पत्र !!

जाहिरात

 

कृषी-तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटेंना पीएचडी

schedule22 Jun 25 person by visibility 28 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या "संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी" विभागातील संशोधक विद्यार्थी उत्कर्ष अरुण आवळेकर व योगेश विरुपाक्ष चिमटे यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या विषयात विद्यापीठाकडून पीएचडी पदवी जाहीर झाली आहे. उत्कर्ष अरुण आवळेकर यांनी  "क्लाऊड कंप्युटिंग आणि वायरलेस सेन्सर नेटवर्कचा वापर करून आयओटी आणि एआय आधारित स्मार्ट शेती प्रणाली" या विषयावर डॉ. जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण करून शोधनिबंध सादर केला. योगेश विरुपाक्ष चिमटे यांनी "आंबा व भुईमूग पिकांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी एकत्रित मशीन लर्निग तंत्रज्ञानाचा वापर" या विषयावर प्रा. डॉ. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण करून शोधनिबंध सादर केला. या दोघांना,  कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलगुरू पके. प्रथापन, कुलसचिव जे. ए. खोत, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, डॉ. मुरली मनोहर भूपती,  मुख्य वित्त अधिकारी सुजित सरनाईक, कॅम्पस संचालक डॉ. एस. बी. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes