हद्दवाढीच्या प्रस्तावात नवी उजळाईवाडीचा समावेश, पीरवाडीचा चुकून उल्लेख-राजेश क्षीरसागर
schedule22 Jun 25 person by visibility 93 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरच्या प्रस्तावित हद्दवाढीत समाविष्ठ आठ गावांमध्ये पीरवाडीचा उल्लेख हा चुकून झाला आहे. हद्दवाढीत नवी उजळाईवाडीचा समावेश करण्याचे ठरले असल्याचे पत्रक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे, हद्दवाढीच्या पत्रकार परिषदेत पीरवाडी या गावाच्या नावाचा चुकून उल्लेख करण्यात आला आहे. वास्तविक मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये उचगांव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगांव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी या गावांसह आठवे गाव म्हणून नवी उजळाईवाडी या गावाचा समावेश करण्याचे ठरले होते. याबाबत तात्काळ कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात सुधारणा करून नवी उजळाईवाडी या गावाचा हद्दवाढीत समावेश करणेबाबत सुधारित पत्र सोमवारी (२३ जून) रोजी देण्यात येणार आहे.