Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजर्षी शाहू विद्यामंदिराला माजी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेटकेंद्र, राज्य सरकारने राजर्षी  शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे कृती करावी : खासदार शाहू महाराजपालकमंत्री आबिटकर, आमदार महाडिकांनी केली क्रीडा संकुलाची पाहणीउद्योजकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उद्योगमंत्र्यांच्यासोबत विशेष बैठककृषी-तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटेंना पीएचडीजिल्ह्यात ३६८४ शाळांमध्ये योगदिन साजराहद्दवाढीच्या प्रस्तावात नवी उजळाईवाडीचा समावेश, पीरवाडीचा चुकून उल्लेख-राजेश क्षीरसागरकोटा, पुणेच्या धर्तीवर कागलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र करणार-मंत्री हसन मुश्रीफपप्पा सांगा कुणाचे… पप्पा साऱ्या कलारसिकांचे ! अरुण सरनाईक म्हणजे मराठी सिनेमाचे सिंहासन!! हद्दवाढीचे काम निस्वार्थपणे, कुठलाही स्वार्थ नाही ! आठ गावांच्या समावेशाबाबत आयुक्तांना पत्र !!

जाहिरात

 

राजर्षी शाहू विद्यामंदिराला माजी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

schedule23 Jun 25 person by visibility 25 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११ मध्ये माजी विद्यार्थी यांनी शाळेला शैक्षणिक साहित्याची भेट दिली. त्यांनी शाळेच्या ग्रंथालयाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ व मुलांना वह्या भेट दिल्या. यापुढे शाळेला जी काही मदत लागेल ती देण्यासाठी आम्ही शाळेचे माजी विद्यार्थी कधीही तयार आहोत असे सांगितले. ज्या शाळेने आम्हांला मोठे केले, त्या शाळेला आपण मोठे करू असे स्पष्ट केले. शाळेचे केंद्र शाळा मुख्याध्यापक  अजितकुमार पाटील यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक जे शाळेचे माजी विद्यार्थी होते त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी व बालभारतीचे माजी भांडार व्यवस्थापक किशोर पाटील, मराठा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक अजित पाटील, प्रेस व्यावसायियक शरद पाटील, महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी कृष्णात मुळीक,नितीन रणदिवे उपस्थित होते. रावसाहेब किर्तीकर यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes