गारगोटीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव
schedule08 Jan 25 person by visibility 48 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व शासकीय, स्वयंसेवी संस्था, बाह्य शाळांमधील बालकांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव ११ ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत गारगोटी येथे होत आहे. श्री मौनी विद्यापीठाच्या पटांगणावर हा महोत्सव होणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शनिवारी सकाळी अकरा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी दिली आहे.
मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर आप्पा देसाई, आजरा-भुदरगडचे उपविभागीय अधिकारी हरेश सुळ, भुदरगडच्या तहसिलदार डॉ. अर्चना पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, मौनी विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील, कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत चव्हाण, बाल न्याय मंडळाचे सदस्य शशिकांत कुरणे व बाल कल्याण समितीच्या सदस्या अँड.अश्विनी खाडे, अँड. शिल्पा सुतार व पद्मजा गारे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या महोत्सवांतर्गत यामध्ये खो-खो, कबड्डी, शंभर मी.धावणे, रिले, कॅरम, लांब उडी, गोळा फेक, बुध्दीबळ, चित्रकला, वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, डॉज बॉल, लंगडी, क्रिकेट, उंच उडी, वैयक्तिक गायन स्पर्धा, समुह गायन, वैयक्तिक नृत्य आणि सामुहिक नृत्य या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेकरिता महिला व बाल विकास विभागांतर्गत असणाऱ्या बालगृहातील ५०० मुले/मुली या क्रिडा स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी, १३ जानेवारीला दुपारी 3 वाजता जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे.