शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी
schedule08 Jan 25 person by visibility 1295 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना मुंबई विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील पीएच. डी. पदवी जाहीर झाली. शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी, सेवासदन कॉलेज ऑफ एज्युकेशन, उल्हासनगर या महाविद्यालयामार्फत ‘अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्याप्रती विशेष शिक्षक आणि सामान्य शिक्षकांचा दृष्टीकोन आणि अभिरूचीचा तुलनात्मक अभ्यास" या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. डॉ. बिना एस. खेमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले. एक कुशल आणि गतिमान प्रशासक म्हणून शिक्षणाधिकारी शेंडकर यांची ओळख आहे. त्यांनी सादर केलेल्या शोध प्रबंधास बुधवारी पीएचडी जाहीर झाली.जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.