संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये नव संकल्पपित तंत्रज्ञान प्रकल्पाचे सादरीकरण
schedule08 Jan 25 person by visibility 45 categoryशैक्षणिकक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘इनोक्वेस्ट’ प्रथम वर्ष डिग्री अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल आणि इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले, यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झालेउद्घाटनास इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रतीक स्वामी, प्रा. मुजमील बेपारी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल थिकने, सर्व विभागाचे विभाग प्रमुख , प्राध्यापक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
‘इन्स्टिट्यूटमधील पदवी अभ्यासक्रम संलग्नित प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी दाखल केलेले १२ डिझाईन पेटंट्स प्रोजेक्ट्स आणि ११ प्रोटोटाइप यांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. संजय घोडावत इन्स्टिटयूटचे वेगळेपण आणि गुणवत्तेचे दर्शन विद्यार्थ्याच्या सादरीकरणातून घडले. याप्रसंगी विश्वस्त भोसले म्हणाले ‘येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉरमेशन आणि कमी खर्चात सर्वोत्तम उपाय देऊन समस्येचे निराकरण करणे हे येणाऱ्या भावी अभियंत्यांसाठी मोठे आव्हान आहे. आणि या आव्हानाच्या दिशेने वाटचाल इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी करतांना दिसतात. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमधून त्यांची नवकल्पना, सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य यांचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन केलेल्या प्राध्यापकांचे भोसले यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या वेळी डॉ. गिरी यांनी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून पेटंट दाखल करणे हे इन्स्टिट्यूटसाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे.’