Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इंडिया आघाडीतर्फे रविवारी दसरा चौक ते माणगावपर्यंत सन्मान बाइक रॅलीजिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेचे रेकॉर्ड तयार होणार, शिक्षण विभागातर्फे मिशन विद्याभूमीउपक्रम !पंचगंगा नदी मरणासन्न होत असताना अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या ! पंकजा मुंडेंचा सवालशिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयाची हॅटिट्रकप्रभात-रॉयल थिएटर बनले पीआर सिनेप्लेक्स, एक पडदा चित्रपटगृहाला मल्टिप्लेक्सचा लूककोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट-क्षीरसागरांची क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाहीआयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर दिसणार  लंडन ब्रिज- युरोपियन स्ट्रीट डॉ. जे. के. पवार यांच्या साहित्यकृतीस राज्य साहित्य विशेष पुरस्कार प्रदानभारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्धापनदिन उत्साहात साजरातपोवन मैदान येथे शुक्रवारपासून सतेज कृषी-पशुपक्षी प्रदर्शन

जाहिरात

 

छछ झज

schedule18 Dec 24 person by visibility 23 category

 

 जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा स्तरीय खातेप्रमुख आणि  जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी आणि तालुका स्तरीय खातेप्रमुख यांची समन्वय सभा paar पडली. या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकाळी दहा वाजल्यापासून उपस्थित राहून आढवा घेतला व मार्गदर्शन केले. आज दिवसभरात विकासात्मक प्रशासन आणि तालुका स्तरीय यंत्रणेची विविध योजनांच्या अंमलबावणीमध्ये असणारी भूमिका आणि करावयाची कर्तव्ये या बाबत सखोल चर्चा करण्यात आली. सकाळी 10 वाजले पासून ते संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत जवळपास 10 तास बैठक सुरू होती
विविध विभागांछा आढावा घेताना पशू संवर्धन विभागाकडील पशू गणानेचे काम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये डिसेंबर अखेर सुरू झाले पाहिजे या बाबत गट विकास अधिकारी यांना सुचा देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रामधून  दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क असावे . संस्थात्मक प्रसूती बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेताना वैयक्तिक स्वाचाता गृहाच उद्दिष्ट १००%साध्य होईल याकडे गट विकास अधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे तसेच घान कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिये ची सर्व मंजूर कामांचा अहवाल 27 डिसेंबर पर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.घरकुल योजनेच्या सर्व निकषांवर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील या करिता जाणीवपूर्वक प्रयत्न करावे आणि यामध्ये लाभार्थी व ग्रामपंचायत यंत्रणा यांना सहभागी करण्याच्या सूचना दिल्या. घरकुल पूर्ण करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या
जल जीवन मिशन मध्ये ज्या गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत तथापी अद्याप सुरू झाल्या नाहीत त्या गावाच्या पदाधिकाऱ्यांना गत विकास अधिकारी यांनी समक्ष चर्चेला बोलावून कामे सुरू होतील या कडे लक्ष द्यावे अन्यथा या गावाच्या योजनेबाबत गांभीर्यपूर्वक निर्णय घेतला जाईल असा इशाराही दिला. जिल्ह्यातील ज्या कर्मचाऱ्यांची खाते निहाय   चौकशी प्रस्तावित केलेली आहे अथवा ज्यांची खाते निहाय चौकशीची प्रक्रिया सुरू आहे अशी सर्व प्रकरणे गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः आढावा घेऊन निकाली निघतील याबाबत दक्षता घ्यावी माननीय विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अहवाल वाचनात दिलेल्या सूचनेनुसार गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत कोणतेही सहानुभूती न बाळगता त्याच्यावर कारवाईबाबत तात्काळ प्रकिया करण्यात यावी.  ग्रामपंचायत विभागाकडील आढाव्या दरम्यान पंधरावा वित्त आयोगाचा खर्च आराखड्यानुसार पूर्ण करण्याच्या सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला तसेच तालुकास्तरीय तक्रारींचा त्याच स्तरावर गटविकास अधिकारी यांनी निपटारा  केल्यास जिल्हास्तरावर या तक्रारी येणार नाहीत याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशाही सूचना दिली
जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांचे गुणांकन केले आहे. त्यांच्याकडील एकूण कामकाजाच्या मुद्द्यावर 140 गुणांचे गुणांकन करण्यात आले आहेत. त्यानुसार  राधानगरी  तालुका  86.56 गुनासह  प्रथम क्रमांकावर असून कागल  तालुका 86.45 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे 
 सर्वात कमी गुण  करवीर  तालुक्याला 76.52 आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने गुणांकन केले असून याच नुसार गट विकास अधिकारी यांच्या कामगिरीचे वार्षिक मूल्यांकन केले जाणार आहे 
सदर बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयान , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष जोशी प्रकल्प संचालक श्रीमती सुषमा देसाई व जिल्हास्तरीय सर्व खाते प्रमुख आणि तालुक्याचे सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते
गट विकास अधिकारी यांचे गुणांकन खालील प्रमाणे आहे 
 1) राधानगरी - 86.56
 2) कागल - 86.45
 3) भुदरगड - 86.26
 4) गगनबावडा - 83.78 
5) शिरोळ - 83.27
 6) हातकणंगले - 81.58
  7)शाहूवाडी - 80.96
  8) आजरा - 79
9) करवीर - 76.52
10) चंदगड - 76.66
11) पन्हाळा - 77.68
 12) गडहिंग्लज - 77.94

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes