श्रीवर्धन बनसोडेची राष्ट्रीय बेसबॅाल स्पर्धेसाठी निवड
schedule09 Jan 25 person by visibility 66 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बारामती येथे झालेल्या १९ वर्षे मुले मुली शालेय शासकीय बेसबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत श्रीवर्धन बनसोडेने उपविजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या संघात श्रीवर्धन बनसोडे यांची निवड झाली. सध्या तो आदर्श गुरुकुल वडगांव येथे ११वी सायन्स या वर्गात शिकत आहे. १४ ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत नांदेड येथे होणाऱ्या शालेय शासकीय बेसबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्हा बेसबॉल असोसिएशन अध्यक्ष धनंजय महाडिक, जिल्हा क्रीडाधीकारी निलीमा अडसुळ यांचे प्रोत्साहन लाभ्ले. क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.