साऊंड सिस्टीम-लेझर लाईटला फाटा देणाऱ्या खंडोबा तालीम मंडळाचा सत्कार
schedule02 Sep 25 person by visibility 66 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी पेठेतील श्री खंडोबा तालीम मंडळाने यावर्षी गणेशोत्सवासाठी भली मोठ्ठी साऊंड सिस्टीम व लेझर लाईटचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. या समाजहिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करण्यासाठी कोल्हापूरातील ‘शहरभान’ या सामाजिक चळवळीतील नागरिकांनी त्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव केला. सोमवारी सायंकाळी खंडोबा तालीम मंडळात हा कार्यक्रम झाला.
खंडोबा तालीम मंडळातर्फे अध्यक्ष अजित हारूगले यांनी सत्काराला उत्तर देताना कृतज्ञता व्यक्त केली. तसेच खंडोबाचे जेष्ठ कार्यकर्ते अरूण पोवार यांनी मंडळाच्या कामाविषयी माहिती दिली. माजी उपमहापौर विक्रम जरग, शाहीर राजू राऊत, अवनिचे संजय पाटील, सत्यजित जाधव, गजानन देशमुख, किसन कल्याणकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. आर्किटेक्ट जीवन बोडके, चंद्रकांत सूर्यवंशी, पत्रकार सुधाकर काशिद, पर्यावरण अभ्यासक सुहास वायंगणकर यांची मनोगते झाली. अभिनेते भरत दैनी, नितीन कुलकर्णी, वृक्षमित्र अमोल बुढ्ढे, रामेश्वर पत्की, यांनी खंडोबा तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. माजी फुटबॉल खेळाडू मनोज शिंदे बालिंगेकर, संतोष तावडे, श्रीधर परब, शाम पोवार, स्वप्निल शिंदे, सुधीर हांजे, अमरदीप कुंडले उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.