महापालिका कर्मचारी मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर
schedule02 Sep 25 person by visibility 44 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात प्रशासन उदासिन आहे. प्रशासनाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ महापालिका कर्मचारी संघाने मंगळवारी (२ सप्टेंबर २०२५) मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला. कर्मचारी संघाने यापूर्वी दोन वेळेला संपाचा इशारा दिला होता, मात्र या कालावधीत प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या समस्यांच्या सोडवणुकीसंबंधी कोणतीही कार्यवाही केली नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी संघाने विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये, ‘लाड-पागे समिती शिफारशीनुसार वारसांना नियुक्ती, गणवेश द्यावेत. सातव्या वेतन आयोगाचा फरक द्यावा, महत्वाच्या विभागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तीन वर्षापेक्षा जास्त एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करावी’ या मागण्यांचा समावेश आहे. मात्र प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही असे कर्मचारी संघाने म्हटले आहे. कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे, मुख्य संघटक संजय भोसले, उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, सरचिटणीस अजित तिवले, रवींद्र काळे आदी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.