अयोध्या फाउंडेशन शिंगणापूरतर्फे मुंबईकडे शिदोरी रवाना
schedule01 Sep 25 person by visibility 31 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील सहभागी आंदोलकांना कोल्हापुरातून शिदोरी पाठविण्यात आली. सकल मराठा समाज व अयोध्या फाउंडेशन शिंगणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दुपारी चार टन साहित्य मुंबईकडे रवाना झाले. यामध्ये भाकरी व ईतर खाद्यपदार्थांचा समावेश आहे. कॅप्टन उत्तम पाटील, मकरंद कुलकर्णी, शिवाजी कारंडे, विनायक पाटील, संदीप देसाई, दीपक कांबळे, संजय शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वाहने रवाना झाली. दसरा चौक येथील राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे साहित्य मुंबईला पाठविण्यात आले यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या