सेवानिवृत्त सैनिकाचा मेव्हण्यावर गोळीबार
schedule01 Sep 25 person by visibility 364 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील नावली येथे सोमवारी (१ सप्टेंबर २०२५) गोळीबारची घटना घडली. सेवानिवृत्त सैनिक निलेश राजाराम मोहिते यांनी आपला मेहुणा विनोद अशोक पाटील यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये विनोद पाटील हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोडोली येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. गोळीबार झाल्याचे समजताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या चार दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. शिये फाटा येथे शनिवारी गोळीबाराचा प्रकार घडला होता. पोलिसांनी, या प्रकरणी गणेश शेलारला ताब्यात घेतले होते.