गणेशोत्सव कामासाठी गैरहजर राहिल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई, महापालिकेने काढला आदेश
schedule01 Sep 25 person by visibility 153 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील घरगुती गणपती व सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनदिनी महापालिकेने विविध ठिकाणी कर्मचारी व शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. हे कामकाज अत्यावश्यक सेवेतील आहे. नेमणूक केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यादिवशी संबंधित ठिकाणी उपस्थिती अत्यावश्यक आहे. जर कोणी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन नियम २००५ अंतर्गत कारवाई केली जाईल असे महापालिकेने म्हटले आहे. उपायुक्त कपिल जगताप यांनी यासंबंधी पत्रक काढले आहे.
घरगुती गणपती विसर्जन व सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी महापालिकेने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ठिकठिकाणी नेमणुका केल्या आहेत. यामध्ये महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच शहरातील खासगी आणि महापालिका शाळेतील शंभरहून अधिक शिक्षकांना नेमले आहे. दरम्यान शिक्षक संघटनांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाला तसे पत्रही दिले आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने सोमवारी कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामावर हजर राहण्याविषयी आदेश काढला आहे.