Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवायपी ग्रुपचे ध्येय, जगातील टॉप ५०० विद्यापीठात स्थान ! कोल्हापुरात सर्वात उंच २३ मजली इमारत उभारणार!!गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच डीवाय पाटील विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी - लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयलपाइपलाइन योजनेवरुन काँग्रेस-भाजपमध्ये वाकयुद्ध, काँग्रेसच्या चर्चेच्या आव्हानाला जयंत पाटलांचे प्रत्युत्तरसेवानिवृत्त सैनिकाचा मेव्हण्यावर गोळीबारअयोध्या फाउंडेशन शिंगणापूरतर्फे मुंबईकडे शिदोरी रवानाआंदोलनासाठी जमलेले मनसेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यातकेआयटीत विशेष इंडक्शनने प्रथम वर्षाला प्रारंभभुयेवाडी-सादळेमादळे रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा, राष्ट्रवादीतर्फे अजित पवारांना निवेदनगोकुळच्या जाजम-घडयाळ खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती, पंधरा दिवसात अहवाल सादर होणारशिये फाटा येथे गोळीबार, संभापूरचा तरुण पोलिसांच्या ताब्यात

जाहिरात

 

गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच डीवाय पाटील विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी - लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल

schedule01 Sep 25 person by visibility 98 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मानवी मूल्य आणि नैतिकता या माध्यमातूनच राष्ट्राची प्रगती शक्य आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरीही देणारे डी. वाय. पाटील विद्यापीठ येत्या काही वर्षात जागतिक  दर्जावर नावलौकिक मिळवेल’असे प्रतिपादन आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांनी केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या २० वा स्थापना दिवस कार्यक्रम सोमवारी (एक सप्टेंबर २०२५) दिमाखात साजरा झाला. याप्रसंगी कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए. मिलिंद काळे यांना डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी पाटील यांच्याहस्ते 'डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले. हॉटेस सयाजी येथे हा कार्यक्रम झाला. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सल्लागार वृषाली पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठ प्रांगणात लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांच्या हस्ते ध्वजवंदन व त्यानंतर विद्यापीठ गीत झाले.  

पुरस्कार वितरणप्रसंगी कुलपती डॉ. संजय डी. पाटील डॉ. पाटील म्हणाले, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मि‍लींद काळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना अतिशय आनंद होत असल्याचे सांगितले. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मि‍लींद काळे  यांनी, डी वाय पाटील विद्यापीठाने दिलेली कौतुकाची थाप आणखी जबाबदारी वाढवणारी आहे. पाटील कुटुंबाने  राज्यभर शिक्षणाची वनराई तयार केली आहे. आपल्या आयुष्यातील हा प्रथमच अर्थिक पुरस्कार आहे.शेती व शेतकऱ्याची प्रगती झाली तरच आपणं पुढें जाऊ शकतो. यासाठी पुरस्काराचे एक लाख रूपये आणि आपल्याकडील एक लाख रूपये असे दोन लाख रूपये डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठातील संशोधनासाठी देत आहे.’

कुलगुरू राकेश कुमार शर्मा यांनी डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. कुलसचिव  डॉ. व्ही. व्ही. भोसले  यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अजित पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. अर्पिता पांडे - तिवारी, प्रा. मैथिली पाटील, प्रा.स्नेहल शिंदे यांनी केले. याप्रसंगी माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, डॉ माणिकराव साळोखे, डॉ. विलासराव साळोखे, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे, डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डीचे कुलगुरू प्रा. मनीष भल्ला, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पी एस पाटील, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अभय जोशी, डॉ. शिंपा शर्मा, सी.एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, डॉ. अद्वैत राठोड, डॉ . वैशाली गायकवाड, डॉ. आर. बी. नेरली, डॉ. राजेश ख्यालाप्पा, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. अजित पाटील, डॉ. अमृतकूवर रायजदे, डॉ. उमाराणी जे., डॉ. आर. एस. पाटील, रुधिर बार्देस्कर, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशिल इंगळे उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes