सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण, पोलिसांच्या अपयशाचेही पोलखोल होणार
schedule08 Apr 22 person by visibility 998 categoryराजकीय
शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्यामागील मास्टरमाईंड कोण ?
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे गेली साठ वर्षे समाजकारण, राजकारण करतात. या कालावधीत त्यांच्यावर अनेक प्रसंग आले पण डगमगले नाहीत. त्यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यामागील मास्टरमाईंड कोण ? शिवाय या प्रकाराविषयी पोलिसांनाही अगोदर माहिती मिळाली नाही, हे पोलिसांचेही अपयश आहे. मुंबईत जाउन त्यासंबंधी माहिती घेउ’असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात सांगितले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी राजारामपुरी येथे त्यांची सभा झाली.
अजित पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे गेली साठ वर्षे समाजकारण, राजकारण करतात. या कालावधीत त्यांच्यावर अनेक प्रसंग आले पण डगमगले नाहीत. मजूर, शेतकरी, कष्टकरी,बारा बलुतेदार अशा विविध घटकांना आधार देण्याचे काम केले. चार वेळेला मुख्यमंत्री होते. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली. हायकोर्टाच्या निकालानंतर कर्मचाऱ्यांनी पेढे वाटले,गुलाल उधळला. मग असं काय घडलं. काही लोक एसटी कर्मचाऱ्यांना भडकाविण्याचा प्रकार केला. ज्येष्ठ नेते पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याचा प्रकार घडला. हल्ला करणाऱ्यांना कुणी भडकाविले ? या हल्ल्यामागील मास्टरमाईंड कोण? त्यांना कोणी चिथावणी दिली? या प्रकाराची माहिती पोलिस खात्याला अगोदर मिळू शकली नाही, पोलिसांचे हे अपयश आहे. मुंबईत जाउन त्याचीही माहिती घेउ. हल्ल्यासारख्या प्रकार कुणी खपवून घेणार नाही ’