गोकुळतर्फे स्मार्ट वजन काटे-साहित्याचे वाटप
schedule20 May 25 person by visibility 24 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डिंग प्रोग्रॅम) एन.डी.डी.बी.ने गोकुळ दूध संघास २०२४-२५ ते २०२६-२७ या सालाकरीता मंजुर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी करणाऱ्या संघाच्या स्वयंसेवक (मिल्क रेकॉर्डर) यांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय, बोरवडे शीतकरण केंद्र व गडहिंग्लज शीतकरण केंद्रावरती ४५ दूध मोजणी व तपासणी सेंटरची स्थापन केली असून प्रत्येक दूध तपासणी सेंटरवर एक आहार संतुलन कार्यक्रमामधील (आर.बी.पी.) स्वयंसेवकांची दूध तपासणीस (मिल्क रेकॉर्डर) म्हणुन नियुक्त केली आहे. त्यांच्यामार्फत निवडलेल्या जनावरांची महिन्यातून एकदा दूध, फॅट व एस.एन.एफ.ची मोजणी व तपासणी ११ महिने केली जाणार आहे. तसेच ६ दूध मोजणी झालेनंतर जनावरांच्या रक्ताचे नमुने घेवून त्यांच्यातील आनुवंशिक गुणाच्या तपासणीसाठी डी. एन. ए. तपासणी केली जाणार आहे. दुधाचे नमुने संघाच्या ताराबाई पार्क येथे मिल्क स्कॅनर मशिनद्वारे दुधाची गुणप्रत तपासून त्याची नोंद भारत पशुधन अॅप्लीकेशनमध्ये केली जाणार आहे. हा कार्यक्रम एन.डी.डी.बी.च्या मार्गदर्शना खाली चालू असल्याचे डॉ. दयावर्धन कामत यांनी सांगितले.
यावेळी संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंके, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.रणजीत चोपडे उपस्थित होते.