Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बंड शमले, अरुण डोंगळेंचा राजीनामा, नेतेमंडळींची सरशी ! शिवसेना महानगर समन्वयकपदी कमलाकर जगदाळेनाळ कोल्हापूरच्या मातीशी जुळलेली…नाते जडलेले आकाशाशी !अलमट्टीसंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक, महाविकासच्या खासदार-आमदारांना ठेवले बैठकीपासून लांब !  सतेज पाटलांचा सरकारवर निशाणा !!सामाजिक उपक्रमांनी किशोर घाटगेंचा वाढदिवस साजराभारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरात शिवसेनेतर्फे तिरंगा पदयात्रागोकुळतर्फे  स्मार्ट वजन काटे-साहित्याचे वाटपराजकारण्यांना सत्ता-फायद्याच्या विषयात इंटरेस्ट, हद्दवाढीचे देणेघेणे नाही –कृती समितीचा आरोपबिल्डर लॉबीसाठी हद्दवाढीचा उद्योग - विरोधी कृती समितीचा आरोपयंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच ! विद्यार्थ्यांनी ऑफलाइन प्रवेश घेऊ नये !!

जाहिरात

 

बंड शमले, अरुण डोंगळेंचा राजीनामा, नेतेमंडळींची सरशी !

schedule20 May 25 person by visibility 65 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अध्यक्षपदावरुन गोकुळमधील राजकारणाला मिळालेली उकळी सात दिवसानंतर थंडावली. चेअरमन अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी तो कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्याकडे दिला. गोकुळच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी, २२ मे २०२५ रोजी होणार आहे. त्या बैठकीत डोंगळे हे राजीनामा सादर करतील. दरम्यान डोंगळे यांनी अध्यक्षपदावरुन बंड पुकारल्यामुळे सत्ताधारी आघाडीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का होता. महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्याचे सांगत डोंगळे यांनी खळबळ उडवून दिली होती. सात दिवसाच्या घडामोडीनंतर डोंगळे यांचा राजीनामा झाल्यामुळे प्रथम दर्शनी नेते मंडळीची सरशी झाल्याचे चित्र आहे. नवीन अध्यक्ष हा महायुतीचा असणार की आणखी कोणी ? याकडे नजरा लागल्या आहेत.

दरम्यान येत्या गुरुवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर राजीनामा मंजूर झाल्यानंतर तो डीडीआर दुग्ध विभाग यांच्याकडे पाटविण्यात येतो. त्यांनी मंजूर केल्यानंतर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणकडे तो सादर होतो. प्राधिकरणकडून नवीन अध्यक्ष निवडीची तारीख घोषित होते. गेले आठ दिवस गोकुळचे राजकारण राज्यभर गाजत राहिले. अध्यक्ष डोंगळे यांनी १५ मे रोजी राजीनामा सादर केला नाही. त्यांनी, मुंबईत जाऊन मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली

. यानंतर गोकुळचा नवा अध्यक्ष हा महायुतीचा असला पाहिजे अशा सूचना आहेत. तोपर्यंत राजीनामा देणार नाही असे सांगितले. दुसरीकडे अध्यक्ष डोंगळे यांचे बंड मोडून काढण्यासाठी सत्ताधारी आघाडीचे नेते मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांनी जातीनिशी लक्ष घातले. सत्ताधारी आघाडीच्या निवडून आलेल्या १७ व दोन स्वीकृत अशा १९ संचालकांनी नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गोकुळमध्ये डोंगळे एकाकी पडल्याचे चित्र होते. गेले पाच दिवस गोकुळमध्ये पडद्याआड राजकीय घडामोडी सुरू होत्या. शह-काटशहाचे राजकारण सुरू होते.

डोंगळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही झाला. दोन दिवसापूर्वी मुश्रीफ व त्यांची बैठक झाली. डोंगळे यांनी माघार घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मंगळवारी, डोंगळे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी, मंत्री मुश्रीफ यांच्या मुंबईतील निवासस्थानी चर्चा केली. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र प्रशासनाकडे सोपविले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes