बिल्डर लॉबीसाठी हद्दवाढीचा उद्योग - विरोधी कृती समितीचा आरोप
schedule20 May 25 person by visibility 18 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘हद्दवाढीत ४२ गावातील एकाही गावाची इंचभर जागा देणार नाही. मुळात पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील लोकांची बाजू समजून घेतल्याशिवाय हद्दवाढीबाबतचा कोणताही निर्णय घेऊ नये.अन्यथा तीव्र आंदोलन करू’ असा इशारा हद्दवाढ विरोधी समितीने दिला. विरोधी समितीचे अध्यक्ष व उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडेकर, कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, शशिकांत खवरे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ‘मूठभर लोकांच्या हितासाठी हद्दवाढीचा विषय रेटला जात आहे. ४२ गावासाठी स्थापन झालेले नागरी विकास प्राधिकरण अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. हद्दवाढ कृती समितीने दबावाचे राजकारण करू नये. शहरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. बिल्डर लॉबीसाठी हद्दवाढीचा उद्योग सुरू आहे.’ याकडेडी या मंडळींनी लक्ष वेधले.