सामाजिक उपक्रमांनी किशोर घाटगेंचा वाढदिवस साजरा
schedule20 May 25 person by visibility 228 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरी थाळी दसरा चौक, व उत्तरेश्वर थाळी गंगावेश चौक या ठिकाणी गरीब व गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले. वाढदिवसानिमित्त घाटगे यांना खासदार खासदार शाहू महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. सर्किट हाऊस येथे जिल्हा व शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वाढदिवस साजरा केला. संयुकत पंचगंगा, संयुक्त उत्तरेश्वर शिवजयंती उत्सव समिती, सर्व पक्षीय कृती समिती चे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार, सहनिमंत्रक माजी नगरसेवक बाबा पार्टे बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, दिलीप पवार, राजू जाधव, काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. विविध संस्था, संघटनेच्या प्रतिनिधींनी सदिच्छा व्यक्त केल्या.