भारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरात शिवसेनेतर्फे तिरंगा पदयात्रा
schedule20 May 25 person by visibility 45 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी शौर्य गाजवत पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले. भारतीय सैन्य दलाच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी (२० मे २०२५) तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तिरंगा पदयात्रा निघाली. कार्यकर्त्यांनी, भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सैन्याचा विजय असो, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला याप्रसंगी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी पहलगाम सारख्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देऊन भारतीय सैन्याने शौर्य आणि पराक्रम याचे अनोखे दर्शन संपूर्ण जगाला दाखवले असून पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे, भविष्यात असा भ्याड हल्ला पुन्हा करण्याचा प्रयत्न झाल्यास सैन्य दलाकडून जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल.’
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, गौरी माळदकर, पूजा पाटील, सुनिता भोपळे, पूजा कामते, तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, सुनील खोत, राहुल चव्हाण, कमलाकर जगदाळे, अंकुश निपाणीकर, अश्विन शेळके, प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, कुणाल शिंदे, अविनाश कामते, दादू शिंदे, सौरभ कुलकर्णी, अर्जुन आंबी, राजेंद्र जाधव, सचिन पाटील, कपिल नाळे, तन्वीर बेपारी, योगेश चौगले, कपिल सरनाईक, शुभम शिंदे, श्रीकांत मंडलिक, रिक्षासेना शहरप्रमुख राजू पवार, आसिफ मुल्लांनी, मंगेश चितारे, यशवंत माळकर, प्रदीप मोहिते, अजिंक्य शिदृक सहभागी झाले होते.