शिवसेना महानगर समन्वयकपदी कमलाकर जगदाळे
schedule20 May 25 person by visibility 30 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना कोल्हापूर महानगर समन्वयक पदावर कमलाकर वसंतराव जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने या निवड झाली. जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचे सहकार्य लाभले. जगदाळे हे २००६ ते ०९ या कालावधीत त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुखपदाची धुरा सांभाळली आहे. तत्कालीन भारतीय विद्यार्थी सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख व सद्याचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कॉलेज तेथे विद्यार्थी सेनेची शाखा स्थापन केल्या. त्यांनी वाढीव घरफाळा, पाणीपट्टी, वीजबिल दरवाढ, महागाई विरोधातील आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार क्षीरसागर यांच्या निवडणुकीतही मोलाचा वाटा त्यांनी उचलला आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंती उत्सवात संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदाची धुरा पार पाडली. राजर्षी शाहू स्पोर्ट्स फुटबॉल क्लब अध्यक्ष, राजारामपुरी ग्राहक शाकाहारी संस्था चेअरमन, छत्रपती कामगार इंडस्ट्रीयल को ऑप हौसिंग सोसायटी सचिव अशा पदांवर ते कार्यरत आहेत.