राजकारण्यांना सत्ता-फायद्याच्या विषयात इंटरेस्ट, हद्दवाढीचे देणेघेणे नाही –कृती समितीचा आरोप
schedule20 May 25 person by visibility 25 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शहरवासियांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात हद्दवाढीअभावी मर्यादा पडत आहेत. राजकारण्यांना केवळ फायदा आणि सत्तेत रस आहे. त्यांना हद्दवाढीचे काही पडलेले नाही’अशा शब्दांत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने भावना व्यक्त केल्या. कृती समितीच्या शिष्टमंडळाने, खासदार शाहू महाराज यांची भेट घेऊन हद्दवाढीसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. याप्रसंगी खासदार शाहू महाराज यांनी, ‘ग्रामीण भागातील लोकांशी हद्दवाढीबाबत पहिल्यांदा चर्चा करतो. नंतर शहर व ग्रामीण अशी संयुक्त बैठक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत घेऊ.’असे सांगितले. कृती समितीच्या शिष्टमंडळात निमंत्रक व माजी महापौर आर. के. पोवार, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, सचिन चव्हाण, दिलीप देसाई, अशोक भंडारे, अनिल कदम, अनिल घाटगे, किशोर घाटगे, राजू जाधव, प्रमोद दाभाडे, सुनील पाटील आदीचा समावेश होता.