यंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच ! विद्यार्थ्यांनी ऑफलाइन प्रवेश घेऊ नये !!
schedule19 May 25 person by visibility 41 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात अर्थात जून २०२५ पासून राज्यातील सर्व क्षेत्राकरिता अल्पसंख्यांक दर्जासह उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखा मधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन करण्यात येणार आहे.ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही असे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित करताना पालकांनी सरकारी निर्णयप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक राहील तसेच प्रवेश निश्चित केले नंतर विषयांमध्ये बदल केल्यास संबंधित विषयासाठी नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क द्यावे लागेल. सरकारमान्य प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयास करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रत्येक प्रवेश फेरीदरम्यान शासन मान्यता प्रवेश क्षमतेनुसार शिल्लक प्रवेश क्षमता तपासून घ्यावी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये.
सीबीएसई व आयसीएसई या बोर्डाच्या उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये ऑन लाईन प्रवेश होणार नसून फक्त राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेश केले जाणार आहेत. तेव्हा ऑफलाईन प्रवेश निश्चित करू नका. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रवेश होणार असल्याने ऑनलाईन प्रवेशासाठी कागदपत्रे तयार ठेवून वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन माहिती भरावी व इयत्ता ११ वीत प्रवेश घ्यावा असे आवाहन शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी केले आहे.