स्विमिंग हब फाऊंडेशनतर्फे जानेवारीत जलतरण स्पर्धा
schedule24 Dec 24 person by visibility 91 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील स्विमिंग हब फाऊंडेशनतर्फे २५ व २६ जानेवारी २०२५ या कालावधीत तिसऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावांनी ही स्पर्धा होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शाहू कॉलेजमधील ‘राष्ट्रीय खेळाडू सागर पाटील जलतरण तलाव कदमवाडी ’येथे स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची माहिती wwwswimminghub.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे. दोन जानेवारीपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची मुदत आहे. वय वर्षे सहा ते वय वर्षे बारा या वयोगटातील मुले-मुलींना यामध्ये सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी व्यक्तिगत चॅम्पियनशीपसाठी रोख रक्कम बक्षीस स्वरुपात आहे. सहा गटामध्ये बक्षीसे व सन्मानचिन्हे, मेडल्स, सहभाग, सर्टिफिकेट दिली जाणार आहेत. अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.