खाबूगिरी थांबेना, ७५ हजाराची लाच ! नगर भूमापन अधिकाऱ्याला पोलिस कोठडी!!
schedule23 Dec 24 person by visibility 241 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इचलरकरंजी येथील नगर भूमापन अधिकारी दुष्यंत विश्वास कोळी याला ७५ हजार रुपयांची लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. कोर्टापुढे उभे केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. कोळी मूळचे शिरोळ येथील आहेत. सध्या सांगली रोड, इचलकरंजी येथे वास्तव होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणातील तक्रारदाराने मौजे शहापूर येथील प्लॉटचे एकत्रीकरण करण्यासाठी अर्ज केले होते. कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने तक्रारदारांशी संपर्क साधत तुमचे काम कोल्हापुरातील कार्यलयात आहे. त्या कामाचा कार्यभारही माझ्याकडे आहे. इचलकरंजीतून तुमच्या अर्जाला मंजुरी आणतो. त्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितली. तसेच तक्रारदाराला इचलकरंजी नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळीची भेट घेण्यास सांगितले.
प्लॉटचे एकत्रीकरण करण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे तपासात समोर आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, सोमवारी कारवाई केली. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अटक करुन कोर्टासमोर उभे केले असता कोळीला दोन दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, हेड काँन्स्टेबल संदीप काशिद, सचिन पाटील, सुधीर पाटील, पूनम पाटील, प्रशांत दावणे यांनी सहभाग घेतला.