भारतीय कृषक समाजतर्फे पुरस्कार जाहीर, २७ डिसेंबरला वितरण
schedule23 Dec 24 person by visibility 25 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय कृषक समाज, महाराष्ट्र राज्य आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख यांची १२६ वी जयंती उत्सव सोहळा २७ डिसेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिनी सकाळी ११ वाजता कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, पुणे-नाशिक हायवे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी भारतीय कृषक समाज शेतकरी मेळावा तसेच कृषी-उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार वितरण होणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख जलरत्न पुरस्कार डॉ. चंद्रकांत भोयर (नागपूर), कृषीरत्न पुरस्कार आकाशचंद्र मोतीसिंग गौरठाकुर (छ. संभाजीनगर), केशवराव गोपाळराव देशमुख (अकोला), मनिषा सुनिल पोटे (नाशिक), यज्ञेश वसंत सावे (पालघर), तसेच कृषीभूषण पुरस्कार बाळासाहेब बाबासाहेब पाटील (सांगली), दत्तात्रय बाबुराव घाडगे (सोलापूर), प्रा. रंगनाथ बाजीराव भापकर (अहिल्यानगर), मनोज जानरावजी जंवजाळ (नागपूर), विजय भानुदास मुळे (ता. खटाव, जि. सातारा) तसेच उद्योगभूषण पुरस्कार सपना पंकज तायडे (अमरावती), राधिका रुपेश घाटगे (शिरूर, घोडनदी), अनुराधा राहुल काशिद (भोर, पुणे), रुपाली शेषराव गायकवाड (बुलढाणा), संतोष देवराव गादे (नेवासा, जि. शिर्डी) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
या सोहळयासाठी भारतीय कृषक समाज राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. कृष्णबीर चौधरी, नवीदिल्ली व प्रभारी ज्योती सुरसे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष नलांगे, महिलाध्यक्षा स्वाती बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भारतीय कृषक समाजतर्फे जैविक ग्राम संकल्पना राबविण्याचे ठरविली आहे. महाराष्ट्रात प्रथम पुणे विभागाची निवड झाली असून पुणे विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जैविक ग्राम कासारे या गावाची निवड केली आहे.