जिप कर्मचारी सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत मुलांना बक्षीस वितरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
schedule23 Dec 24 person by visibility 117 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतर्फे सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावी बारावी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविलेल्या, पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परिक्षा, जवाहर नवोदय विद्यालय तसेच कला क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या मुला-मुलींना बक्षीस वितरण केरे.
जिल्हा परिषदेच्या सेवेतून ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार झाला. साईक्स एक्स्टेंशन येथील संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांची प्रमुख उपस्थिती होते.
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाहुण्यांच्या हस्ते १३७ विद्यार्थी व ५४ सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करणेत आला. संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये बसविलेल्या सौर उर्जा निर्मिती पॅनलचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत योजने अंतर्गत जिल्हा परिषद सोसायटी, सर्व संचालक, सुकाणू समिती यांनी निःक्षय मित्र होवून १५० पोषण आहार किट क्षय रूग्णासाठी मंजूर केले. प्रातिनिधीक स्वरूपात प्रमोद बाबर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या हस्ते व इतर मान्यवरांचे हस्ते ५ रूग्णांना पोषन आहार किट वाटप करण्यात आले.
सोसायटीचे चेअरमन सुधाकर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सुनिल पाटील यांनी स्वागत केले. व्हाइस चेअरमन सचिन गुरव यांनी आभार मानले.सुकाणू समितीचे एम आर पाटील, महावीर सोळांकुरे, संचालक उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, दिंडे, नंदिप मोरे, साताप्पा मगदूम, जयकुमार रेळेकर, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, तज्ञ संचालक बाबासो साळोखे, पांडुरंग इंगळे, व्यवस्थापक व्ही. एन बोरगे आदी उपस्थित होते.