शहाजी कॉलेजतर्फे बहिरेश्वरमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप
schedule23 Dec 24 person by visibility 42 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व भूगोल विभागातर्फे माजी मंत्री श्रीपतराव शंकरराव बोंद्रे व विजयराव श्रीपतराव बोंद्रे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त विद्यामंदिर बहिरेश्वर येथील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण, सरपंच वंदना निवृत्ती दिंडे पाटील, उपसरपंच रंगराव बापू कामत, मुख्याध्यापक गंगाराम भागोजी बाजारी, एन एस एस विभाग प्रमुख डॉ. डी.एल.काशीद पाटील,आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी हे शैक्षणिक साहित्य घेतले.
प्राचार्य शानेदिवाण म्हणाले, लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मध्ये संस्काराची बीजे रुजली पाहिजेत. या शैक्षणिक साहित्यातून त्यांची प्रगती होईल आणि त्यातूनच हे विद्यार्थी परत समाजाला सेवा वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जपतील.
शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष गणेश बचाटे यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक गंगाराम भागोजी बाजारी यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. डी. एल. काशीद यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ काशीद पाटील यांनी आभार मानले. डॉ. डॉ एस डी जाधव, डॉ के एम देसाई, डॉ.ए.बी.बलुगडे उपस्थित होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.