रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्काराचे बुधवारी वितरण, गडहिंग्लजमध्ये कार्यक्रम
schedule24 Dec 24 person by visibility 22 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विद्या प्रसारक मंडळ व जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार वितरण समारंभ बुधवारी (२५ डिसेंबर २०२४) होत आहे. यंदाचा पुरस्कार हा सामाजिक कार्यकर्त्या कांचन परुळकेर यांना जाहीर झाला आहे. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. याप्रसंगी ‘श्रीमती रत्नमाला घाळी कौशल्य विकास दालन’चे उद्घाटन आहे. विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. गडहिंग्लज येथील डॉ. एस. एस. घाळी सांस्कृतिक सभागृह, डॉ. घाळी कॉलेज येथे दुपारी ३.३० वाजता कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.