न्यू कॉलेजमध्ये 16 सप्टेंबरला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
schedule11 Sep 25 person by visibility 126 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शाश्वत फाउंडेशन, न्यू कॉलेज मराठी विभाग आणि आणि भाषा विकास संशोधन संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 16 सप्टेंबर 2025 रोजी खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होत आहे. राष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त आयोजित ही स्पर्धा न्यू कॉलेजमधील ऑडिटोरियम हॉल येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. सह्याद्री वक्तृत्व स्पर्धा या नावाने होणाऱ्या या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सत्तरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतल्याची माहिती न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी दिली.
या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी, "अभिजात मराठी भाषा- वास्तव आणि वर्तमान, महाराष्ट्र कालचा आजचा आणि उद्याचा, लोकशाही आणि निवडणुका, भारत महासत्ता झाला का ? महाराष्ट्राने देशाला काय दिले ? नव शैक्षणिक धोरण ता तारक की मारक" हे विषय आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला पंधरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला 7000 रुपये आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकाचे वय 20 ते 35 वर्षे यादरम्यान असावे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी फी दोनशे रुपये इतकी आहे या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रा. जी. आर. पाटील (९०७५०५७४१६) व प्रभाकर पाटील (9158185300 ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.