नाकोडा स्पोर्ट्स अकॅडेमीतर्फे खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन
schedule11 Sep 25 person by visibility 22 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नाकोडा स्पोर्ट्स अॅकेडमीतर्फे ११ ते १३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशी माहिती प्रशिक्षिका अनिंदिता बसाक यांनी दिली. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात ही स्पर्धा होणार आहे. मिडजेट,कॅडेट, सब जुनिअर, जुनिअर, यूथ ,ओपन व वेटेरन अशा विभागांमध्ये पुरुष व महिला गटांत स्पर्धा घेतल्या जातील.
गोवा, कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, बेळगाव , पुणे, सोलापूर व कोकणातून मिळून दीडशेवर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. विजेते , उपविजेते व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षीस व ट्रा्फी दिले जाणार आहे. एकूण ८७ हजार रुपयांची बक्षीसे आहेत.पत्की जोशी इंजिनिअर्स व काँट्रॅक्टर्स, मोतीभाई दोशी फौंडेशन ,धीरज इंडस्ट्रीज हे ख्य प्रायोजकत्व लाभले आहे, कॉन्स्ट्रोसिस वॉटरप्रूफिंग प्रा ली , श्री ऑटोमेशन सर्विसेस सहकार्य लाभले आहे. जीकेआय कंपनी ने स्पोर्ट्स ब्रँड पार्टनर म्हणून सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी निशा विजय पत्की, निकित दोशी, राजेंद्र पाटील विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरणसाठी भारतीय टेबल टेनिस महिला संघाच्या प्रशिक्षक कांचन बसाक यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. नागरिकांना या स्पर्धा पाहण्यास मोफत प्रवेश आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नाकोडाचे प्रदीप राठोड व क्लबच्या मार्गदर्शिका व ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू शिल्पा जोशी यांनी केले आहे. स्पर्धेसाठी केतकी देशपांडे व अनिंदिता बसाक या मुख्य पंच म्हणून काम पाहणार आहेत.