बारा तास कामाचा परिपत्रक तात्काळ रद्द करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन
schedule10 Sep 25 person by visibility 28 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारने, जारी केलेल्या १२ तास कामकाजाच्या परिपत्रकाचा भारतीय मजदूर संघाने तीव्र निषेध केला आहे. संघाच्या महाराष्ट्र प्रदेश शिष्टमंडळाने कामगारमंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन परिपत्रक रद्द करण्यासंबंधी निवदेन दिले. यावेळी शिष्टमंडळाने, आठ तास काम व ४८ तास आठवडा हा कायद्याने संरक्षित हक्क आहे.१२ तास कामामुळे रोजगाराच्या संधी कमी होतील. महिलांचे व कुटुंबीय जीवन धोक्यात येईल. कामगारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मंत्री फुंडकर यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच महागाई भत्त्या बाबतीत सरकार ने सकारात्मक निर्णय करून कामगारांना न्याय मिळवून देण्यात यावा अशीही मागणी सचिन मेंगाळे सरचिटणीस अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ यांनी केले आहे. शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल डुमणे, महामंत्री किरण मिलगीर, संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, वीज उद्योगातील कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात, कोशाध्यक्ष सागर पवार, संघटन सचिव उमेश आणेराव, मुंबई सचिव संदीप कदम, मोहन येणुरे, सुरेश पाटील उपस्थित होते.