Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ना शोध समिती - ना जाहिरात, कुलगुरू निवड प्रक्रिया लांबणीवर ! नवे कुलगुरू लाभणार २०२६ मध्ये ! !कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अतिक्रमणे वाढली ? महाद्वार रोड, ताराबाई रोड अतिक्रमणमुक्त कराकोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जाभारत सरकारच्या पेटंट विषयक वैज्ञानिक सल्लागारपदी प्रा. सी.डी. लोखंडेतंत्रज्ञान विकासासाठी आंतरराष्ट्रीयस्तरावर परस्पर समन्वय आवश्यक- मिग्सु झियाटोल प्रकरणी कोल्हापूर खंडपीठात याचिका, तीन जिल्हाधिकाऱ्यांसह अनेकांना सुनावणीसंबंधी नोटिसा न्यू कॉलेजमध्ये 16 सप्टेंबरला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धानाकोडा स्पोर्ट्स अकॅडेमीतर्फे खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन ओला दुष्काळ जाहीर करा,  शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर पन्नास हजाराची मदत द्या- व्ही. बी. पाटीलबारा तास कामाचा परिपत्रक तात्काळ रद्द करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन

जाहिरात

 

टोल प्रकरणी कोल्हापूर खंडपीठात याचिका, तीन जिल्हाधिकाऱ्यांसह अनेकांना सुनावणीसंबंधी नोटिसा

schedule11 Sep 25 person by visibility 77 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब  आहेत, त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येत नाही. त्या अनुषंगाने कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी अशी याचिका कोल्हापूर खंडपीठात माजी खासदार राजू यांनी दाखल केली.  कोल्हापूर खंडपीठाने  याबाबत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य , रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव त्याबरोबरच कोल्हापूर , सांगली , सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत  नोटीसा लागू करण्यात आल्या आहेत. अशी माहिती शेट्टी यांनी दिली आहे
     दोन आठवड्यापूर्वी केरळ राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या खराब रस्त्यांच्या दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भुषण गवई  यांच्या त्रिसदस्यीय समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची याचिका फेटाळून फटकारले होते. या पार्श्वभूमीवर  शेट्टी यांनी कोल्हापूर ते पुणे हा रस्ता अत्यंत निकृष्ठ झालेला असून जोपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल आकारणी न करण्याची मागणी खंडपीठात केली आहे. 
        याचिकेमध्ये  शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री , मुख्य सचिव , रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव त्याबरोबरच कोल्हापूर , सांगली , सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी केले आहे.कोल्हापूर ते पुणे या २४० किलोमीटरच्या महामार्गावर प्रवास करण्यासाठी ज्याठिकाणी ३ तासात पोहचणे अपेक्षित असताना सध्या ७ तास लागत आहेत. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होवू लागले आहे. पावसाळ्यात प्रवास करताना अनेक मोठे अपघात झाले असून वाहतूकदारांना प्रचंड मनस्ताप होवू लागला आहे. 
          कोल्हापूर खंडपीठाकडून मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान प्राधिकरणासह वरील सर्व विभागांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत नोटीसा लागू करण्यात आल्या आहेत. सध्या कोल्हापूर ते पुणे या महामार्गावर दैनंदिन दीड ते दोन कोटी रूपयांची टोल वसुली केली जात आहे मात्र वाहतूकदारांना  सुविधा कोणत्याच दिल्या जात नाहीत. असे शेट्टी यांनी म्हटले आहे

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes