भारत सरकारच्या पेटंट विषयक वैज्ञानिक सल्लागारपदी प्रा. सी.डी. लोखंडे
schedule11 Sep 25 person by visibility 38 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डीसीप्लेनरी स्टडीजचे अधिष्ठाता आणि संशोधन संचालक प्रा. (डॉ.) सी.डी. लोखंडे यांची भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या नियंत्रक जनरल कार्यालयातर्फे पेटंट विषयक वैज्ञानिक सल्लागार पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. लोखंडे हे गेल्या zjh वर्षांपासून डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात संशोधन संचालक म्हणून कार्यरत असून त्यांनी ७५० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत. त्याचबरोबर १०० पेक्षा अधिक पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत. डॉ. लोखंडे यांची नियुक्ती कोल्हापूर आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठासाठी गौरवाची बाब असून त्यांच्या वैज्ञानिक योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. या नियुक्तीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.