तंत्रज्ञान विकासासाठी आंतरराष्ट्रीयस्तरावर परस्पर समन्वय आवश्यक- मिग्सु झिया
schedule11 Sep 25 person by visibility 89 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘तंत्रज्ञान विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्पर समन्वय व सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारच्या परिषदांमधून नवनवीन कल्पनांना सादर करण्याची संधी तरुण अभियंता, शास्त्रज्ञांना मिळते. जागतिक स्तरावर मटेरियल हा फार मोठा संशोधनाचा व सातत्याने विकसित होणारा विषय आहे. सर्वच प्रकारच्या उद्योग क्षेत्रांमध्ये मटेरियल्स या विषयाला घेऊन जागतिक स्तरावर फार मोठे संशोधन सुरू आहे.’ असे मत निन्झिया युनिव्हर्सिटी चीन विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. मिग्सु झिया यांनी व्यक्त केले.
येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढाकाराने व शांघाई ज्याओ टॉग युनिव्हर्सिटी,चीन निन्झिया युनिव्हर्सिटी,चीन व एजीएच युनिव्हर्सिटी,पोलंड तीन आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय इनोव्हेटिव्ह इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी या विषयाला घेऊन परिषदेचे आयोजन केले आहे. संस्थेचे संचालक व या परिषदेचे समन्वयक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे मुख्य उद्घाटक प्रा. मिग्सु झिया यांनी उद्घाटन सत्रामध्ये आयआयटी भुवनेश्वरचे डॉ. ब्रिज कुमार धीन्द्रा व फ्रान्स येथील आयटीईआर या प्रोजेक्टमधील मुख्य अधिकारी श्रीशैल पडसलगी यांनी विचार व्यक्त केले. चीनमधील शांघाई ज्याओ टॉग युनिव्हर्सिटी चे प्रा.जून ली व पोलंड येथील एजीएच विद्यापीठाचे डॉ. क्रिस्तोफ गारबॉक्स यांनी अनुक्रमे उर्जा व स्पेस रिसर्च विषयासंबंधी मार्गदर्शन केले.
संस्थेचे चेअरमन अध्यक्ष साजिद हुदली यांनी आंतरराष्ट्रीय परिसंवादातून तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होत असताना नवनवीन कल्पना नवनवीन विचार उदयाला येतात. जगाचे भवितव्य अधिक चांगले होण्यासाठी देशादेशांमध्ये अशा प्रकारचा संवाद सातत्याने होत राहणे आवश्यक आहे.प्रा. श्रुती काशीद व प्रा.जहिदा खान यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेचे सहसमन्वयक डॉ प्रशांत पोवार यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे सचिव दीपक चौगुले, परिषदेचे सह-समन्वयक डॉ.वाय.एम.पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.व्यंकटेश्वर व डॉ.अन्वेष मंडल उपस्थित होते.