ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर पन्नास हजाराची मदत द्या- व्ही. बी. पाटील
schedule10 Sep 25 person by visibility 36 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : यंदा पंधरा मे पासून पाऊस जोरदार बरसला. अद्यापही पाऊस सुरू आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी पिके काढणीपूर्वीच शेतात कुजून गेली. उन्हाळी व खरिपाची पिके सततच्या पावसामुळे प्रभावित झाली असून शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे, त्यांचा उत्पादन खर्चही चालू हंगामात त्यांच्या अंगावर आहे. त्यातच खतांच्या वाढलेल्या किमती, महागाई यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आणखीनच वाढलेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत सरकाने प्राधान्याने करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, सरचिटणीस सुनील देसाई, उत्तर विधानसभा अध्यक्ष गणेश जाधव, बाजीराव खाडे, करवीर तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, सहकार सेल अध्यक्ष संजय शिंदे, अविनाश माने, गणेश नलवडे, सुरेश कुरणे, रवी कांबळे उपस्थित होते.