जिप कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीकांत चव्हाण, व्हाईस चेअरमनपदी रविंद्र जरळी
schedule19 Aug 25 person by visibility 122 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीकांत नारायण चव्हाण, व्हाईस चेअरमनपदी रविंद्र करबसप्पा जरळी यांची निवड झाली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेतील कार्याल अधीक्षक उदय उलपे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची १८ ऑगस्ट २०२५ रोजी बैठक झाली. या बैठकीत या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
चेअरमनपदासाठी चव्हाण यांचे नाव संचालक सुनील पाटील यांनी सुचविले. संचालक अमर पाटील यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी जरळी यांचे नाव संचालक साताप्पा मगदूम यांनी सुचविले. संचालक मुजम्मिल नावळेकर यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमनांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालक सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजित पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, संजय शिंदे, बाजीराव पाटील, सरदार दिंडे, नंदीप मोरे, जयकुमार रेळेकर, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, तज्ज्ञ संचालक दिलीप पाटील,दिपक बुरुड उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना चेअरमन चव्हाण व व्हाईस चेअरमन जरळी म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने आदर्शवत कामगिरीने नावलौकिक प्राप्त केला आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची मातृसंस्था असलेल्या या सोसायटीने सभासदांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबीक उत्कर्षामध्ये मोलाचा हातभार लावला आहे. सभासदांच्या हिताचे काम करताना संसथेने आर्थिक झेप घेतली आहे. संस्थेच्या नावलौकिकात वाढ होईल या पद्धतीने कामकाज करू. पारदर्शक व काटकसरीने कारभार करू.’
या निवडीप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, एम. एम. पाटील, के.आर. किरुळकर, राजाराम वरुटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, साताप्पा मोहिते, अजित मगदूम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट आदी उपस्थित होते.