कोल्हापूर इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांची डोळे तपासणी
schedule21 Aug 25 person by visibility 81 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर इंग्लिश स्कूल आणि विद्योद्य विद्यालय कोल्हापूर येथे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनमार्फत मोफत नेत्ररोग तपासणी करण्यात आली. यासाठी नंदादीप नेत्रालयचे सहकार्य लाभले.कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. ए. बी. पाटील, सचिव डॉ. अरुण धुमाळे, डॉ. संदीप पाटील, रोटरी मुव्हमेंटचे अध्यक्ष शितल दुग्गे, कोल्हापूर इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापिका व माजी नगरसेविका उमा बनछोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नंदादीप आय हॉस्पिटलचे डॉ.शोभना परब, अनन्या शारवा,योगेश पाटील, सुयश निकम यांच्या टीमने नेत्रतपासणी केली. कोल्हापूर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती योगिता पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ए. बी. पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. डोळयांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांकडून व्यायाम करवून घेण्यात आले. मोबाइलच अतिरिक्त वापर टाळावा. वैयक्तिक स्वच्छता, सुंदर परिसर, आनंदी वृत्ती, सकस आहार यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहाय्यक शिक्षिका गायत्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. विद्योद्य विद्यालयचे मुख्याध्यापक श्रीकांत पवार यांनी आभार मानले.